Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात रविवारी “संगीत आशा”

Spread the love

 

 

बेळगाव : स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या सदाबहार’ गाण्यांवरं आधारित ‘संगीत आशा’ हा मराठी व हिंदी गीतांचा, कार्यक्रम रविवार दि. २४ सायंकाळी ५ वाजता लोकमान्य रंगमंदिरात आयोजित केला आहे. प्रा. दत्ता नाडगौडा, विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटी व मराठी भाषाप्रेमी मंडळातर्फे सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नितीन कपिलेश्वरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

प्रसिद्ध गायिका संगीता बांदेकर-कुलकर्णी कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजात आशा भोसले यांची अजरामर गीते ऐकण्याची संधी बेळगावकर रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व संगीत रसिकांसाठी विनामूल्य असून मोफत प्रवेशिका उपलब्ध आहेत. मात्र, सभागृहातील पहिल्या पाच रांगा निमंत्रित आणि विशेष अतिथींसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, आशाजींच्या गीतांचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवण्यासाठी संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य अविनाश कुलकर्णी, संगीता बांदेकर – कुलकर्णी, नीता कुलकर्णी, चेअरमन कुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *