Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

धाब्यावरील स्वयंपाकी व वेटरला मारहाण प्रकरणी आरोपी निर्दोष

  बेळगाव : “भात जास्त शिजलेला का दिला? चांगले जेवण द्यायला येत नाही का?” असा जाब विचारत धाब्यातील स्वयंपाकी आणि वेटरला काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात दुसरे जेएमएफसी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीमुळे न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी सिद्धाप्पा चांगाप्पा तुडयेकर (वय ३५, …

Read More »

बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेगाडीला रेल्वेमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

  बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. या नव्या रेल्वेमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून बेळगावमार्गे धावणाऱ्या या गाडीमुळे दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण …

Read More »

दिल्लीमध्ये युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच भव्य भवन उभारणार; मंत्री सतीश जारकीहोळी यांची घोषणा

  बेळगाव : जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायतीच्या वतीने सुवर्ण विधानसभा संकुलात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव मधील सुवर्णसौध येथे आज ‘बेळगाव प्रकाश’ उपक्रमांतर्गत २८० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी …

Read More »

देवराज अर्स कॉलनी येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू; बचाव पथकाला मृतदेह शोधण्यास यश

  बेळगाव : आज दुपारी देवराज अर्स कॉलनी येथील एका तलावात एक अत्यंत दुःखद घटना घडली, ज्यामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण पोहण्यासाठी तलावात उतरला होता; परंतु दुर्दैवाने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. सदर घटनेची माहिती मिळताच बचाव पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विकी मेहता …

Read More »

लहानपणीच मुलांवर वाचन संस्कार केले पाहिजे : शिवाजी हसनेकर

  उचवडे : वाचन संस्कार हे मुलांवर लहानपणीच झाले पाहिजेत. कारण वाचन संस्कार जर लहानपणी झाले तर मुले सुसंस्कारित व बुध्दिने प्रगल्भ होतात, असे संशोधनात पण दिसून आले आहे. वाचन करणाऱ्या माणसाची स्वतःची मतं तयार होतात आणि तो आपली मतं प्रभावीपणे मांडू शकतो. यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजेत, असे विचार …

Read More »

चौदा दुचाकी चोरी प्रकरणी सहा जण ताब्यात; संकेश्वर पोलिसांची कारवाई

  बेळगाव : संकेश्वरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण १४ दुचाकी चोरी करणाऱ्या दोन घटनांमधील सहा जणांना संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. १५ मे रोजी गिरिष तुकाराम सत्यनाईक (रा. भीमनगर, संकेश्वर) यांची दुचाकी चोरीस …

Read More »

बसस्थानकांवर दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक

  अथणी पोलिसांची कारवाई; लाखो रुपयांचे सोने जप्त अथणी : बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन महिलांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अथणी बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन …

Read More »

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे मार्गिकेसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रेल्वेचे काम सुरू करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांना पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना …

Read More »

७व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे दिमाखात अनावरण

बेळगाव ( प्रतिनिधी) : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनाचा ध्यास घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ च्या निमंत्रण पत्रिकेचे आज मराठा मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात अनावरण करण्यात आले. जेष्ठ साहित्यिक यशवंत …

Read More »

बेळगावमध्ये बड्या व्यक्तींना अडकवून खंडणी वसूल करणाऱ्या महिलेला अटक

  बेळगाव : बड्या व्यक्तींना लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर अत्याचाराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या एका टोळीतील महिलेला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. बेळगाव जिल्ह्यात पोलिसांसह अनेक नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या रेणमा मुतगा नावाच्या महिलेवर रौडी शिटरची कारवाई करण्यात आली आहे. या महिलेने …

Read More »