Monday , September 21 2026
Breaking News

चौदा दुचाकी चोरी प्रकरणी सहा जण ताब्यात; संकेश्वर पोलिसांची कारवाई

Spread the love

 

बेळगाव : संकेश्वरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण १४ दुचाकी चोरी करणाऱ्या दोन घटनांमधील सहा जणांना संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

१५ मे रोजी गिरिष तुकाराम सत्यनाईक (रा. भीमनगर, संकेश्वर) यांची दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद संकेश्वर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. १५ जून रोजी बाबुगोडा चंद्रगौडा पाटील (रा. हुक्केरी रोड, संकेश्वर) यांच्या घरासमोरील दुचाकी चोरीस गेली होती. चोरीच्या घटनांचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित चोरट्याचा मोबाईल ट्रॅक करून तपासाचा छडा लावला.

पहिल्या चोरीच्या प्रकरणात संकेश्वर, चिकोडी, यमकनमर्डी, बेळगाव शहर आणि गडहिंग्लज परिसरातून एकूण १० दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले असून सुमारे ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अमित बसवराज कोळी (वय २१) व आनंद यल्लाप्पा घस्ती (वय ३८, दोघे रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) यांना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या चोरीच्या घटनेत सुमित गंगाराम कम्मार (वय २१, रा. निडसोशी), शिवराज निगौंडा पाटील (वय २१, रा. कमतनूर), ओंकार मोहन कडलगी (वय २०, रा. कडलगे, ता. गडहिंग्लज) आणि किरण हेमंत कम्मार (वय १८, रा. निडसोशी) या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर निडसोशी, अंकले व गोकाक परिसरातून चोरी करण्यात आलेल्या चार दुचाकी (किंमत १ लाख ८० हजार रुपये) जप्त करण्यात आल्या.या टोळीविरुद्ध दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ पोलिस निरीक्षक गणपती कोगनोळी, उपनिरीक्षक विठ्ठल नाईक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उमेश शेट्टण्णावर, सी. जी. सारापुरे व पोलिस पथकाने ही कारवाई केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *