Sunday , July 26 2026
Breaking News

लहानपणीच मुलांवर वाचन संस्कार केले पाहिजे : शिवाजी हसनेकर

Spread the love

 

उचवडे : वाचन संस्कार हे मुलांवर लहानपणीच झाले पाहिजेत. कारण वाचन संस्कार जर लहानपणी झाले तर मुले सुसंस्कारित व बुध्दिने प्रगल्भ होतात, असे संशोधनात पण दिसून आले आहे. वाचन करणाऱ्या माणसाची स्वतःची मतं तयार होतात आणि तो आपली मतं प्रभावीपणे मांडू शकतो. यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजेत, असे विचार महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी व्यक्त केले.
उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक सार्वजनिक वाचनालयाचा चौथा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाच्या सभासदांना संबोधित करतांना ते बोलत होते.
वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दशरथ पाटील हे होते.
सुरुवातीला वाचनालयाचे कार्यवाह सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थितांचे स्वागत केले. तर वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पांडुरंग पाटील यांच्याहस्ते वाचनालयाचे पूजन करण्यात आले. नागाप्पा कल्लापा पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी शुभम नागेश पाटील यांनी मिळविलेल्या यशाबद्दल व चांगल्या वाचनाबद्दल त्याचा वाचनालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेकांची समयोचित भाषणे झाली.
याप्रसंगी बाबुराव पाटील, सोमाणा नागोंडे, आकाश पालकर यांच्यासह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.
वाचनालयाचे कार्यवाह सुभाष पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कल्लापा पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *