बेळगाव : शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलन्नवर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, ज्यांच्यावर बेकायदेशीरपणे सार्वजनिक निधी गोळा केल्याचा आरोप आहे. गुरुवारी शिवानंद यांच्या घर, कार्यालय आणि विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभर कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. पोलिसांनी दुपारी शिवानंद यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, …
Read More »LOCAL NEWS
आदर्श विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी
बेळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ, रायबाग संचलित आदर्श विद्यामंदिर, वडगाव या शाळेच्या 1975 ते 1980 पर्यंत दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवार दि. 17 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शाळेच्या आवारात होणार आहे. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार अमरसिंह पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक …
Read More »मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर थेट दरोडा
इंधनदरवाढीवरून सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जगण्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावर …
Read More »तुंगभद्रा धरणाजवळ भीषण अपघात; ट्रॅक्टर पुलावरून कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
बंगळूर : ट्रॅक्टरला मागून टँकर लॉरीने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना शुक्रवारी विजयनगर आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या सीमेवरील तुंगभद्रा धरणाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते …
Read More »२४ मे रोजी ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन
बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण …
Read More »मराठ्यांनो विवाह संस्काराचे पावित्र्य जपा; मराठा समाजाने बदलत्या प्रथांवर विचार करण्याची गरज
हिंदू धर्मामध्ये विवाह संस्थेला अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी विवाह हा पंधरावा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे केवळ व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबांचे आणि दोन आत्म्याचे मिलन होय. हा केवळ शारीरिक संबंध नसून मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक बंध मानला जातो. गृहस्थाश्रम, धर्म, काम …
Read More »मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला दुजोरा देत, “हायकमांडने बोलावल्यासच मी दिल्लीला जाईन. या महिन्याच्या १५ तारखेला दिल्लीला जाण्याचा कोणताही कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट केले. म्हैसूर येथील आपल्या निवासस्थानासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, “आम्ही सर्वजण हायकमांडच्या आदेशानुसार …
Read More »कर्नाटकमध्ये ५.५५ कोटी मतदारांची पडताळणी
देशभरात मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहीम बंगळूर : देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता कायम राखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सघन पुनरावलोकन – तिसरा टप्पा’ राबविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेतील घरगुती नोंदणी …
Read More »मनपाने हटवले शहरातील अनधिकृत बॅनर
बेळगाव : शहरात १७ मे रोजी प्रस्तावित ‘स्वच्छ बेळगाव संभ्रम’ या कार्यक्रमास परवानगी नाकारल्यानंतर मनपाने शहरातील विनापरवाना लावलेले फ्लेक्स आणि बॅनर हटविण्याची मोहीम राबवली आहे. शिवम असोसिएट्स यांच्या वतीने सरदार मैदानावर स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुमारे २५ हजार नागरिक उपस्थित राहण्याची …
Read More »हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या संशयिताला अटक
बेळगाव : शहरात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत शस्त्र घेऊन फिरणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १३ मे २०२६ रोजी बेळगाव शहर आणि ग्रामीण उपविभागात राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुती नगर तिसऱ्या क्रॉस जवळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta