Sunday , September 20 2026
Breaking News

२४ मे रोजी ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील यांनी दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून यंदाचे साहित्य संमेलन विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी समृद्ध होणार असल्याचे सांगितले. उद्घाटन सत्र, संमेलनाध्यक्षांचे भाषण, प्रेरणादायी शिवव्याख्यान तसेच बहारदार काव्यमैफिल अशा तीन प्रमुख सत्रांमध्ये संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असून साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

या बैठकीस परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, एम. के. पाटील, रणजीत चौगुले, संजय गुरव, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, मनीषा नाडगौडा, गीता घाडी, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, नेत्रा मेणसे, स्मिता किल्लेकर, संजीवनी खंडागळे आणि स्मिता मेंडके उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *