Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

श्रमदानाने रस्त्यावरील खड्डा बुजवणाऱ्या दोघा रहदारी पोलिसांचा सत्कार

  बेळगाव : स्वतः पोलीस असूनही शहरातील श्री शनी मंदिराजवळ रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा भर उन्हात हातात फावडा घेऊन श्रमदानाने बुजवणाऱ्या दोघा रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांचा शहरवासीय व वकीलवर्गातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे या दोन सत्कारमूर्ती रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे शिवपुत्र हुडेद आणि शिवाप्पा दोडभिमापगोळ …

Read More »

मानस फुटबॉल अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश

  बेळगाव : कलिंगड गोवा येथे बडोदा फुटबॉल अकादमी गुजरात आयोजित स्पोर्टिंग गोवा फुटबॉल फेस्टिवल अंतर्गत सुरू असलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने बडोदा फुटबॉल क्लबचा 7-3 असा पराभव केला, विजयी संघाच्या हुसेन जमादारने हॅट्रिकसह 5 गोल, …

Read More »

श्री गुरु नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

  बेळगाव : दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जखमी सैनिकांची सुश्रुषा करणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरी केली जाते. याच दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर सर्कल येथील इंद्रचर्या बिल्डिंग मधील श्री गुरु नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे डीन आणि डायरेक्टर अध्यक्ष …

Read More »

फेरतपासणीनंतर मराठी विद्यानिकेतनचा मराठी माध्यमात सोहम हळदणकर जिल्ह्यात प्रथम

  बेळगाव : दिनांक १६ मे रोजी इयत्ता दहावीचा फेरतपासणीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मराठी विद्यानिकेतन शाळेचा सोहम सतीश हळदणकर याने ६२५ पैकी ६१६ गुण मिळवत ९८.५६ टक्के गुणांसह शाळेसह बेळगाव जिल्ह्यात मराठी माध्यमात प्रथम क्रमांक पटकावला. शाळेची विद्यार्थिनी स्नेहा यल्लाप्पा हिरोजी हिने ६२५ पैकी ६१५ गुण मिळवून ९८.४ …

Read More »

श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री शनैश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव यांच्यावतीने श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर आज शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे ॲड. सुधीर सक्री व डॉ. संतोष पत्तार यांच्यासह डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. विठ्ठल माने आदी मान्यवर …

Read More »

बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले : बसवंत शहापूरकर

  बेळगाव : पत्रकारिता म्हणजे नेमकं काय ते एम.डी.मुल्ला यांनी आपल्या लेखणीतून इतर पत्रकारांना आणि लोकांना दाखवून दिलं. त्यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकारिताक्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बसवंत शहापूरकर यांनी केले. बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधन निमित्त आज शनिवारी सायंकाळी मराठा …

Read More »

इस्कॉनमध्ये अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 मे ते 15 जून या कालावधीत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात रोज सायंकाळी 7 ते 8.50 वाजेपर्यंत चौराग्रगण्य अष्टकमचे पठण, दीपदान होणार असून रोज भगवद्गीतेतील 15 व्या अध्यायाचे पठण त्यानंतर …

Read More »

…..हा तर “सिरीयस फायनान्शिअल फ्रॉड” : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : विविध प्रकारच्या आर्थिक फसवणुकींच्या घटना घडत आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्त गेल्या सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटनांवर बारीक नजर ठेवून आहेत. गेल्याच महिन्यात आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या चौकशीसाठी स्कॅम सेल स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार विविध प्रकारे मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवम असोसिएटस संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू …

Read More »

बेळगाव शहरातील नाले सफाई आणि सांडपाणी पाण्याचा निचरा कामाला सुरुवात

  बेळगाव : पावसाळ्यात रस्त्यावर वाहणारे पाणी तसेच इतर अन्य समस्या सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेत नाले सफाई आणि सांडपाणी पाण्याचा निचरा करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शहर उपनगरातील अनेक नागरिकांकडून पावसाळ्यात निर्माण होणारे समस्यांसंदर्भात तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. विविध प्रभागांतील नगरसेवकांनी पावसाळ्यात होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी संदर्भात सूचना …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली ७ वे अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी

  बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे दिमाखात संपन्न होणार आहे. हे संमेलन तीन …

Read More »