Monday , September 21 2026
Breaking News

फेरतपासणीनंतर मराठी विद्यानिकेतनचा मराठी माध्यमात सोहम हळदणकर जिल्ह्यात प्रथम

Spread the love

 

बेळगाव : दिनांक १६ मे रोजी इयत्ता दहावीचा फेरतपासणीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये मराठी विद्यानिकेतन शाळेचा सोहम सतीश हळदणकर याने ६२५ पैकी ६१६ गुण मिळवत ९८.५६ टक्के गुणांसह शाळेसह बेळगाव जिल्ह्यात मराठी माध्यमात प्रथम क्रमांक पटकावला. शाळेची विद्यार्थिनी स्नेहा यल्लाप्पा हिरोजी हिने ६२५ पैकी ६१५ गुण मिळवून ९८.४ टक्के गुणांसह शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला असून, फेरतपासणीनंतर तृतीय क्रमांक अनिकेत बाळकृष्ण जाधव याने ६२५ पैकी ६१३ गुणांसह ९८.०८ टक्के मिळविले.
या यशामुळे मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, पालक, शिक्षक यांनी त्याचे कौतुक केले. बेळगावातील सर्व स्तरातील लोकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *