Sunday , July 26 2026
Breaking News

श्री गुरु नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जखमी सैनिकांची सुश्रुषा करणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरी केली जाते. याच दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर सर्कल येथील इंद्रचर्या बिल्डिंग मधील श्री गुरु नर्सिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे डीन आणि डायरेक्टर अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील आणि प्राचार्य डॉ. गिरीश देगावि यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ.प्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले हेल्थकेअर सर्विस आणि पेशंट केअर मध्ये नर्सची अत्यंत प्रमुख भूमिका आहे. डॉक्टर इतक्याच नर्स देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. यावेळी प्रिन्सिपल डॉक्टर गिरीश देगवी म्हणाले यंदाच्या वर्षी अवर नर्स, अवर फ्युचर, टेम्पुवर्ड नर्सेस सेव लाइव्ह अशी थीम आहे. नर्स (परिचारिका) हे समाजाचा कणा आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवा, समर्पण आणि करुणेचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रुग्णसेवा करताना नर्स ज्या पद्धतीने अहोरात्र कष्ट करतात, ते खरोखरच वंदनीय आहे.मानवता आणि करुणा: आजारपणात रुग्णांना शारीरिक बरे करण्यासोबतच मानसिक आधार देण्याचे काम नर्स करतात. नर्स या आरोग्य व्यवस्थेचा मुख्य पाया आहेत. त्यांच्याशिवाय कोणत्याही समाजाची आरोग्य सेवा अपूर्ण आहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *