Monday , September 21 2026
Breaking News

मानस फुटबॉल अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : कलिंगड गोवा येथे बडोदा फुटबॉल अकादमी गुजरात आयोजित स्पोर्टिंग गोवा फुटबॉल फेस्टिवल अंतर्गत सुरू असलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मानस फुटबॉल अकादमीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पहिल्या सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने बडोदा फुटबॉल क्लबचा 7-3 असा पराभव केला, विजयी संघाच्या हुसेन जमादारने हॅट्रिकसह 5 गोल, हुजेफा अथणी, फैजान शेख यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
दुसऱ्या सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने सोलापूर फुटबॉल अकादमीचा 4-1 असा पराभव केला, विजयी संघाच्या हुजेफा अथनी, हुसेन जमादार, अनिकेत पाटील, हसन जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल केला,.

तिसऱ्या सामन्यात मानस फुटबॉल अकादमीने सेंट जोसेफ गोवा संघाचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला विजयी संघाच्या अनिकेत पाटील, हुसेन जमादार, प्रत्येकी 2 गोल, हुजेफा अथणी व प्रणव पिल्ले प्रत्येकी 1गोल केला.
रविवार ता. 17 रोजी सकाळी 8.00 वाजता मानस फुटबॉल अकादमी वि एमबीबीएस गोवा यांच्यात पहिली उपांत्य लढत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *