Sunday , July 26 2026
Breaking News

वाढत्या उन्हामुळे निपाणी बाजारपेठेत ताडपत्रीची वॉटरबॅग ठरतेय ‘नॅचरल फ्रीज’

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : रणरणत्या उन्हात घसा कोरडा पडल्यावर सामान्यतः फ्रिजच्या थंड पाण्याचा आधार घेतो. मात्र निपाणी बाजारपेठेत सध्या एका अशा ‘देसी फ्रीज’ची चर्चा आहे, जो अवघ्या १५० रुपयांत विजेविना पाणी माठासारखे गार ठेवतो. महिनाभरात सुमारे १०० हून अधिक वॉटरबॅग विक्री झाल्या आहेत. त्याच्या किमती आकारमानानुसार १५० ते ३०० रुपयापर्यंत आहेत. विशेषता वाहन चालकाकडून त्याची मोठ्याने खरेदी होत आहे.
अशोक नगर, नरवीर तानाजी चौक, बेळगाव नाका परिसरात असलेल्या दुकानांमध्ये मिळणारी ही ‘ताडपत्री वॉटरबॅग’ सध्या निपाणीकरांसाठी उन्हाळ्यातील सर्वात मोठे आकर्षण ठरली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वील ही संकल्पना आता नव्या रूपात पुन्हा एकदा घराघरात पोहोचत आहे. ग्राहकांचा विश्वास बसावा, यासाठी विक्रीच्या ठिकाणीच चार-पाच पिशव्या न बॅरलमध्ये पाण्यात भिजवून ठेवल्या आहेत. उन्हाचा पारा जसा वाढत आहे, तशी या ‘नॅचरल फ्रीज’ची मागणीही वाढत आहे. ताडपत्रीच्या कापडापासून तयार केलेली ही वॉटरबॅग विज्ञानाच्या साध्या तत्त्वावर काम करते. कापडाच्या सूक्ष्म छिद्रांतून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे आतील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. फ्रीजमधील ‘चिल्ड’ पाण्यापेक्षा हे पाणी घशासाठी आणि आरोग्यासाठी अधिक पोषक असल्याने नागरिकांकडून याला मोठी पसंती मिळत आहे. दीड लिटर क्षमतेची ही पिशवी प्रवासासाठीही अत्यंत सोयीची आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *