Monday , September 21 2026
Breaking News

श्रमदानाने रस्त्यावरील खड्डा बुजवणाऱ्या दोघा रहदारी पोलिसांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : स्वतः पोलीस असूनही शहरातील श्री शनी मंदिराजवळ रस्त्यावर पडलेला धोकादायक खड्डा भर उन्हात हातात फावडा घेऊन श्रमदानाने बुजवणाऱ्या दोघा रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांचा शहरवासीय व वकीलवर्गातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे या दोन सत्कारमूर्ती रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे शिवपुत्र हुडेद आणि शिवाप्पा दोडभिमापगोळ अशी आहेत. शहरातील श्री शनी मंदिराशेजारी रस्त्यावर कांही विकास कामानिमित्त खोदण्यात आलेला मोठा खड्डा काम पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित बुजवण्यात आला नव्हता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा खड्डा वाहतुकीसाठी फार मोठा अडथळा ठरण्याबरोबरच, अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता. ही बाब श्री शनी मंदिर येथील रस्त्याच्या ठिकाणी रहदारी नियंत्रणासाठी नियुक्त झालेले पोलीस कर्मचारी हुडेद आणि दोडभिमापगोळ यांच्या निदर्शनास येताच कडक उन्हाची पर्वा न करता शेजारील फावडा घेऊन यांनी तो खड्डा श्रमदानाने बुजून रस्ता सुरक्षित केला.

या पद्धतीने ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ ही उक्ती प्रत्यक्षात उतरवण्याची आदर्शवत कृती केल्याबद्दल शहरवासीय व वकीलवर्गातर्फे रहदारी पोलीस कर्मचारी शिवपुत्र हुडेद आणि शिवाप्पा दोडभिमापगोळ यांचा शाल व श्रीफळ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त जे. आर. निकम आणि पोलीस निरीक्षक बसनगौडा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कार प्रसंगी बेळगाव वकील संघटनेचे माजी उपाध्यक्ष ॲड. अण्णासाहेब घोरपडे, बेळगाव कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. एन. आर. लातूर, ॲड. मोहन नंदी, ॲड. चंदू काकडे, ॲड. शरद देसाई, ॲड. राजेंद्र नलवडे, ॲड. विभूती मठ, ॲड. महेंद्र कांबळे, राजू सदाशिवसन्नावर, विनायक गोडखिंडी, संजू कामत, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. गुरुदेव मठपती आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *