Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव शहरातील नाले सफाई आणि सांडपाणी पाण्याचा निचरा कामाला सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : पावसाळ्यात रस्त्यावर वाहणारे पाणी तसेच इतर अन्य समस्या सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेत नाले सफाई आणि सांडपाणी पाण्याचा निचरा करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

शहर उपनगरातील अनेक नागरिकांकडून पावसाळ्यात निर्माण होणारे समस्यांसंदर्भात तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. विविध प्रभागांतील नगरसेवकांनी पावसाळ्यात होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी संदर्भात सूचना केलेल्या आहे. त्याकडे लक्ष देऊन शहर स्वच्छता आणि लवकरच सुरू होणारा पावसाळा या दृष्टीने महापालिकेच्या वतीने कामे हाती घेण्यात आलेले आहेत.
शहराच्या विविध भागांमध्ये नाले साफ करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामात आडव्या आणि विद्युत तारांवर पाणी सांडण्याचा धोका निर्माण झालेला दिसून येत आहे. वाढलेली झाडे काढण्याचे कामही जोरात सुरू आहे.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम यांनी विविध ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आहे. त्याच बरोबर स्थानिक नागरिकांच्या तक्रारीही स्वीकारण्यात आल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विभागीय अभियंता अंकित आणि इतर अधिकारी, वॉर्डन, शहर सेवक आणि कर्मचारी यांना आयुक्तांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामानसंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *