Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

मटका आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; सहा जण ताब्यात

  बेळगाव : शहर आणि ग्रामीण भागात अवैध कृत्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. टिळकवाडी, कॅम्प आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत केलेल्या कारवाईत मटका आणि जुगार खेळणाऱ्या ६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. १३ मे २०२६ रोजी शहरभर पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापे …

Read More »

शिवम असोसिएट्सच्या कार्यालयावर छापा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

  विविध योजनांच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचा संशय बेळगाव : विविध गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे जमा केल्याच्या आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाने शिवम असोसिएट्स प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित कार्यालयावर छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक …

Read More »

हेरॉईन विक्री प्रकरणातील संशयिताला जामीन

  बेळगाव : हेरॉईन विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताला दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध अटींसह जामीन मंजूर केला आहे.महादेव गजानन पाटील (रा. कंग्राळी के.एच.) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. हेरॉईन विक्री करत असल्याच्या संशयावरून सीसीबी पोलिसांनी त्याला 27 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पाच ग्रॅम …

Read More »

शनिवारी राजारामबापू पाटील अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण

  शब्दगंध कवी मंडळ संघाच्या विद्यमाने आयोजन : आ. जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती बेळगाव : लोकनेते राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, बेळगाव येथे करण्यात आले आहे. राजारामबापू पाटील ललित कला अकादमी …

Read More »

फटाका दुर्घटनेतील युवकाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

  बेळगाव : “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत फटाका दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाला मदतीचा हात दिला आहे. शहापूर नवी गल्ली येथील शिवा नारायण लोहार हा युवक मागील महिन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाके वाजवित असताना झालेल्या …

Read More »

आरसीयू मराठी विभागातर्फे उद्या माजी विद्यार्थी मेळावा

  बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ, मराठी विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवारी (ता.१५) सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या (आरपीडी) घोटगे इमारतीतील मराठी विभागात हा कार्यक्रम होणार आहे. माजी विद्यार्थ्यांकडून सर्व तयारी झालेली आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी विभागप्रमुख व साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड असतील. यावेळी विभागप्रमुख …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

  बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी बेळगाव शहर व बेळगाव तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता …

Read More »

हिजाबबाबतचा बंदी आदेश अखेर रद्द; जानवे, रुद्राक्ष, पगडी घालण्यासही परवानगी

  धार्मिक श्रद्धा, शिक्षणात समतोलाचा प्रयत्न बंगळूर : राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या ‘हिजाब’ वादावर कर्नाटक सरकारने अखेर अधिकृत पडदा टाकला आहे. २०२२ मध्ये तत्कालीन सरकारने लागू केलेला हिजाब बंदीला पूरक आदेश मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागे घेतला आहे. १३ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या …

Read More »

जुलैपासून कर्नाटक विधानमंडळ होणार ‘पेपरलेस’ आमदारांना मिळणार बायोमेट्रिक आयपॅड

  बंगळूर : कर्नाटक विधानसभेत लवकरच कागदाच्या वापराला पूर्णविराम मिळणार असून, येत्या जुलैपासून राज्य विधानमंडळ पूर्णपणे ‘पेपरलेस’ पद्धतीने कामकाज करणार आहे. पावसाळी अधिवेशनापासून आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य बायोमेट्रिक-सक्षम आयपॅड आणि विशेष अंतर्गत अ‍ॅपच्या माध्यमातून कामकाज हाताळणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे विधेयके, प्रश्नोत्तरे, कार्यसूची तसेच इतर कागदपत्रांचे गठ्ठे सदस्यांना देण्याची गरज …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे निधन

  बेळगाव – हिंडलगा येथील रहिवाशी ज्येष्ठ मराठी पत्रकार एम. डी. मुल्ला (वय 64) यांचे मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी असून त्या व्यवसायाने डॉक्टर आहे. दोन भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे. गुरुवार 14 रोजी दुपारच्या नमाज नंतर दुपारी एक वाजता आंबेडकर रोड सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुस्लिम स्मशानभूमी …

Read More »