Monday , September 21 2026
Breaking News

आरसीयू मराठी विभागातर्फे उद्या माजी विद्यार्थी मेळावा

Spread the love

 

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ, मराठी विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवारी (ता.१५) सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या (आरपीडी) घोटगे इमारतीतील मराठी विभागात हा कार्यक्रम होणार आहे. माजी विद्यार्थ्यांकडून सर्व तयारी झालेली आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी विभागप्रमुख व साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड असतील. यावेळी विभागप्रमुख डॉ. मनिषा नेसरकर, डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. संजय कांबळे व डॉ. मैज्जोद्दीन मुतवल्ली यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी मराठी संघ, माजी विद्यार्थी संघाची घोषणा केली जाणार आहे. गत पंधरा दिवसांपासून याची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला आतापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना एकत्रित बोलावून चर्चा केली जाणार आहे.तसेच मराठी विभागाच्या उत्कर्षासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. मराठी विभागाच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *