Sunday , September 20 2026
Breaking News

नव्याने बांधलेले स्मशान शेड वापराविना पडून; नगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊनही दुर्लक्ष

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका प्रशासनातर्फे अनेक वर्षांपूर्वी शहराच्या पूर्वेला असलेल्या स्मशान मारुती मंदिराशेजारी स्मशान शेडची निर्मिती करण्यात आली होती. वारंवार हे शेड खराब होत असल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेने या परिसरातच नव्याने स्मशान शेड उभारले आहे. पण ते वापराविना पडून असल्याने शहरवासियांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे स्मशान तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जुन्या स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी दोन ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. पण शेडवरील पत्रे खराब होत असल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे कठीण होते. त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे बऱ्याचदा त्याची दुरुस्ती करण्यात आली. अखेर याच ठिकाणी हजारो रुपये खर्च करून नवीन स्मशान शेड तीन-चार महिन्यापूर्वी निर्माण करण्यात आले आहे. पण त्याचा वापर करून असल्याने नागरिकांची अडचण होत आहे.
स्मशान शेड तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण यांनी दोन महिन्यापूर्वी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन दिले आहे. पण त्या निवेदनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाळापूर्वी स्मशान शेड खुले न केल्यास नगरपालिका समोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *