Monday , September 21 2026
Breaking News

धर्मवीर संभाजीराजे चौकात संभाजीराजे जयंती कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री संभाजी राजे चौकात गुरुवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर पुष्पहार चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी अर्पण केला तर श्रीफळ राजेश कदम यांनी वाढविले.
लक्ष्मण चिंगळे यांनी, धर्मवीर संभाजी राजे यांनी योद्धा म्हणून केलेले कार्य अविस्मरणीय आहे. आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास राज्य महिला काँग्रेसच्या सरचिटणीस केपीसीसी सदस्या सुप्रिया पाटील, निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, रवींद्र शिंदे संजय सांगावकर, झुंजार दबडे, विनोद बल्लारी, अरुण आवळेकर, जरारखान पठाण, सुंदर साळुंखे, बाळासाहेब जासूद, किरण कोकरे, सचिन पवार, युवराज पोळ, अशोक खांडेकर, दीपक वळीवडे, संदीप खडके, विकास शिंदे यांच्यासह मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *