Monday , September 21 2026
Breaking News

हलशी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरकडून रुग्णाला उद्धट वागणूक; रेशन कार्ड नसल्याने नाकारले उपचार

Spread the love

 

खानापूर : सरकारी रुग्णालय हे गरिबांसाठी मंदिर असायला हवे, पण हलसीमध्ये रुग्णाला उपचारांऐवजी रेशन कार्ड विचारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून एका महिला नेत्याने डॉक्टरांची चांगलीच शाळा घेतली.

खानापूर तालुक्यातील हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे दोन महिला रुग्ण अडचणीत आल्या. हत्तरवाड गावातील या महिलांना तीव्र आजार असतानाही डॉक्टरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एका महिलेला मधुमेहाचा त्रास होता तर दुसरीला उलट्या-जुलाबाचा त्रास होत होता. मात्र, उपचार करण्याऐवजी डॉक्टर त्यांना त्रास देत राहिले. अखेर सलाईन लावण्यासाठी रेशन कार्ड नाही, असे कारण सांगून रुग्णाला घरी पाठवून दिले.

हताश होऊन परतणाऱ्या या रुग्णाला पाहून ब्लॉक काँग्रेस महिला अध्यक्षा सावित्री मादार यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून रुग्णालयात नेले. “अशावेळी रुग्णाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण?” अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांना धारेवर धरले. या बेजबाबदार डॉक्टरांविरुद्ध तालुका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सावित्री मादार यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *