Monday , September 21 2026
Breaking News

हेरॉईन विक्री प्रकरणातील संशयिताला जामीन

Spread the love

 

बेळगाव : हेरॉईन विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताला दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध अटींसह जामीन मंजूर केला आहे.महादेव गजानन पाटील (रा. कंग्राळी के.एच.) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. हेरॉईन विक्री करत असल्याच्या संशयावरून सीसीबी पोलिसांनी त्याला 27 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पाच ग्रॅम हेरॉईन जप्त केला. त्यानंतर त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, संशयिताच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एक लाख रुपयांचे हमीपत्र तसेच तितक्याच रकमेचे दोन जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. तसेच साक्षीदारांना कोणतीही धमकी देऊ नये, पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होऊ नये, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.
संशयिताच्या वतीने अ‍ॅड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *