Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटकमध्ये ५.५५ कोटी मतदारांची पडताळणी

Spread the love

 

देशभरात मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहीम

बंगळूर : देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता कायम राखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सघन पुनरावलोकन – तिसरा टप्पा’ राबविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

सध्या सुरू असलेल्या जनगणनेतील घरगुती नोंदणी प्रक्रियेशी समन्वय साधून या मोहिमेचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता उर्वरित देश या टप्प्यात समाविष्ट होणार आहे. या तीन भागांमध्ये प्रतिकूल हवामान आणि हिमवृष्टीमुळे पुढील वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, १२ मे २०२६ पर्यंत कर्नाटकमध्ये एकूण ५ कोटी ५५ लाख ७४ हजार ६४ मतदार नोंदणीकृत आहेत. या व्यापक प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी राज्यात ५९ हजार ५० बूथ लेव्हल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या तारखांनुसार, २० मे ते २९ मेदरम्यान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व तयारी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घराघरांत जाऊन मतदार पडताळणी मोहीम राबवली जाईल. ५ ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान हरकती व दुरुस्त्यांसाठी मुदत दिली जाणार आहे. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केली जाईल.

देशभरात सुमारे ३.९४ लाख बूथ लेव्हल अधिकारी ३६.७३ कोटी मतदारांच्या घरी भेट देणार आहेत. त्यांना विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात आलेले ३.४२ लाख बूथ लेव्हल एजंट्स सहकार्य करणार आहेत. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोगाने सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *