Sunday , July 26 2026
Breaking News

मनपाने हटवले शहरातील अनधिकृत बॅनर

Spread the love

 

बेळगाव : शहरात १७ मे रोजी प्रस्तावित ‘स्वच्छ बेळगाव संभ्रम’ या कार्यक्रमास परवानगी नाकारल्यानंतर मनपाने शहरातील विनापरवाना लावलेले फ्लेक्स आणि बॅनर हटविण्याची मोहीम राबवली आहे.

शिवम असोसिएट्स यांच्या वतीने सरदार मैदानावर स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुमारे २५ हजार नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, आवश्यक प्रशासकीय परवानग्या आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन न झाल्याने जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमास मंजुरी दिली नाही. त्यानंतर मनपाने शहरभर लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि जाहिरात फलक हटवून जप्त केले.

शहराच्या सौंदर्यावर परिणाम करणारे आणि नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेले फलक सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी दिला. तसेच पुढील काळातही अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिरातींवर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *