बेळगाव : हासनचे खासदार, एनडीए आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या कर्मकांडाला शेकडो निष्पाप महिला बळी पडल्या असल्या, तरी भाजपकडून कोणीही त्याचा निषेध करत नसल्याची टीका महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. त्या सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ शेअर करणे योग्य नाही. महिलांच्या हितासाठी कोणीही तसे करू नये, असे त्या म्हणाल्या.
हुबळी येथील नेहाच्या खून प्रकरणाचा आम्ही निषेध केला आहे. पण प्रज्वल रेवणा यांच्या विषयी भाजप का बोलत नाहीत, असा सवाल जगदीश शेट्टर यांना केला. विरोधी पक्षनेते आर. प्रज्वल रेवण्णाच्या कर्मकांडाबद्दल प्रसारमाध्यमांनी अशोक याना विचारल्यावर त्याची दखल घेतली जाईल, असेत्यांनी उत्तर दिले. पण लोकसभा निवडणुकीत युती झाली आहे. तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगाव भाजपच्या अधिवेशनात बेळगाव वंटमुरी महिला अत्याचार आणि नेहा प्रकरण उपस्थित केले. हासनमधील शेकडो महिलांवर आपला मित्रपक्ष उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांनी केलेल्या अन्यायाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल त्यांनी केला. हासनचे भाजप नेते देवराज गौडा यांनी डिसेंबरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपशी युती केली.
म्हैसूरच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, मात्र त्यांनी त्यांना हासनचे तिकीट दिले आणि भाजप त्यांचे संरक्षण करत असल्याचे सांगितले.