Sunday , September 20 2026
Breaking News

निवृत्तीनंतरही किरण देसाई यांनी समाजासाठी योगदान देणे आवश्यक : निवृत्त शिक्षक वसंत देसाई

Spread the love

 

खानापूर : तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतरही किरण देसाई यांनी सामाजिक कार्यासाठी वेळ देत सक्रिय राहून समाजाला मार्गदर्शन करावे, असे मत निवृत्त शिक्षक वसंत देसाई यांनी व्यक्त केले.
हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण देसाई यांच्या निवृत्ती निमित्त हलशीवाडी येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंगाप्पा देसाई होते. यावेळी वसंत देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकाचे कर्तव्य केवळ सेवाकाळापुरते मर्यादित नसून निवृत्तीनंतरही समाजासाठी योगदान देणे आवश्यक आहे. आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत किरण देसाई यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले. विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत, याचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मिलिंद देसाई, वामन देसाई, रघुनाथ देसाई, प्रशांत देसाई, स्मितल देसाई, जलकला देसाई आदींनी मनोगत व्यक्त करताना देसाई यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेवा निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय राहून समाजाला दिशा द्यावी असे मत व्यक्त केले.
प्रारंभी पिकेपीएसचे माजी संचालक अनंत देसाई, वसंत देसाई यांच्या हस्ते किरण देसाई व निंगाप्पा देसाई यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ज्योती देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *