Sunday , July 26 2026
Breaking News

चित्ररथ मिरवणुकीसाठी 2200 पोलीसांचा ताफा; ड्रोन- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

Spread the love

 

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 2200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त बोरसे म्हणाले, शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके वाहतूक विभाग, गुन्हे शाखा तसेच तणाव नियंत्रण पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मिरवणूक मार्गा बरोबरच शहरात कोणताही अनुचित प्रकार घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. मिरवणूक मार्ग व शहरातील विविध महत्त्वाचे चौक याठिकाणी एक हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय दहा ड्रोनची नजर मिरवणुकीवर असणार आहे. तसेच 14 के एस आर पी च्या तुकड्या आणि आठ राखीव दलाच्या तुकड्या मिरवणुकीच्या मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. अन्य पोलीस ताफा मिळून एकूण 2200 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत. मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नाही पोलीस आयुक्त बोरसे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *