Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावनजीक राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : शहरातील येडियुरप्पा मार्गाजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

थांबलेल्या ट्रकला कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गूड्स वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी होती की चालकाच्या शेजारी बसलेले दोघे जण जागीच ठार झाले, तर वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.

प्राथमिक तपासात पहाटेच्या वेळी झोपेच्या अंमलामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर मृतदेह आणि जखमी चालकाला तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोल्हापूरहून शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरबकडे कोंबड्यांची वाहतूक करणारे हे गूड्स वाहन जात होते. या अपघातात वाहनातील शेकडो कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय अविनाश यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *