Monday , September 21 2026
Breaking News

बंगळुरमध्ये हॉटेलला भीषण आग, जीवितहानी टळली

Spread the love

 

बंगळूर : बंगळुरमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून, नुकतेच सुरू करण्यात आलेले ‘शुद्ध तिंडी’ हे हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
नाइस रोडलगत सोम्पुरा सर्कलजवळ असलेल्या या हॉटेलमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण हॉटेल आगीत भस्मसात झाले.
हे हॉटेल नुकतेच गेल्या मार्च महिन्यात सुरू करण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, इडली स्टीमरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हॉटेलमधील सर्व कर्मचारी वेळेत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *