Monday , September 21 2026
Breaking News

परमेश्वर यांच्यावर बेटिंग प्रकरणी एफआयआर; न्यायालयाचा आदेश

Spread the love

 

बंगळूर : राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना बेटिंग प्रकरणामुळे अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ४२व्या एसीजेएम न्यायालयाचे न्यायाधीश के. एम. शिवकुमार यांनी तुमकूर येथील कोडिगेहळ्ळी पोलीस ठाण्याला एफआयआर नोंदवून चौकशी करण्याचे निर्देश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये तुमकूर येथे झालेल्या पीयू कॉलेज विद्यार्थ्यांच्या कबड्डी सामन्यादरम्यान जिल्हाधिकारी शुभा कल्याण यांच्यासोबत ५०० रुपयांची बेटिंग लावल्याचे विधान परमेश्वर यांनी केले होते. हा प्रकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत एच. आर. नागभूषण यांनी खासगी तक्रार दाखल केली होती.
विजेत्या संघाला पारितोषिक देताना स्वतः मंत्र्यांनीच बेटिंग केल्याचे सांगितल्याने हा मुद्दा वादग्रस्त ठरला. “केवळ गंमत म्हणून बेटिंग केले,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले असले तरी या विधानावरून सार्वजनिक स्तरावर मोठी चर्चा रंगली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर आता या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू होणार असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *