Sunday , September 20 2026
Breaking News

ममदापूर (के. एल.) अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त उद्या दोन लाखाची बैलगाडी शर्यत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर (के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रेला रविवार (ता.१९) पासून पालखी मिरवणुकीने प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (ता.२३) सकाळी ९ वाजता विविध शर्यती होणार आहेत.
‘अ ‘गट जनरल बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १ लाख ११ हजार १११ रुपये, ७५ हजार १ रुपये आणि ५५ हजार १ रुपये, जनरल बैलगाडी ‘ब,’ गट गशर्यतीसाठी अनुक्रमे ४१ हजार रुपये ३१ हजार रुपये आणि २१ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. जनरल घोडा गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपये, जनरल घोडा- बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये १० हजार रुपये, बिन जाती घोडा-बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १० हजार रुपये, ७ हजार रुपये आणि पाच हजार रुपये, जनरल दुस्सा चौसा बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व विजेत्यांना ममदापूर केसरी किताब आणि ढाल निशान देण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *