Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत अवतरली अवघी शिवसृष्टी

Spread the love

 

सजीव देखाव्यामुळे फिटले डोळ्याचे पारणे; मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे नेत्रदीपक मिरवणूक

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त नेत्र दीपक मिरवणूक काढण्यात आली. निवडणुकीतील सजीव देखाव्यामुळे शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर, भगवा परिसर, आकर्षक विद्युत रोषणाईमुळे शहरात शिवसृष्टी अवतरण्याचे चित्र दिसून आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.
सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण, माजी नगरसेवक रवींद्र शिंदे यांच्या हस्ते पालखीचे तर माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर मिरवणुकीचे उद्घाटन झाले.
यावेळी श्रीमंत विजयराजे निपाणकर, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रोहन साळवे, सुजय पाटील, गोपाळ नाईक, प्रतीक शाह, राहूल निंबाळकर, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, संजय माने, ओंकार शिंदे, नितीन साळुंखे, करण माने, सूरज राठोड, माजी नगरसेवक विनायक वडे, सुनील शेलार, पांडुरंग भोई, उपस्थित होते.

मिरवणुकीत हलगी, झांजपथक शिवरायांच्या पालखीचा समावेश होता.
शिवगर्जना तरुण मंडळ खरी कॉर्नर यांनी अफजल खान वध, पावले गल्ली तरुण मंडळाने गड आला पण सिंह गेला, गणराय युवक मंडळ दिवेकर कॉलनीतर्फे पावनखिंड देखावा,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने भक्ती शक्ती, संगम व छत्रपती स्पोर्टस् क्लब शिवाजीनगरतर्फे हिरकणी आणि शिवजन्म काळ सोहळा असे देखावे सादर केले होते. मध्यवर्ती शिवाजी चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होऊन चाटे मार्केट, नेहरू चौक, कोठीवाले कॉर्नर, कित्तूर चन्नम्मा सर्कल, अशोक नगर, जुना पी. बी. रोड, बेळगाव नाका मार्गे शिवाजी चौकात आणण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. सजीव देखावा स्पर्धेचे परीक्षण प्रल्हाद नरके, विनायक बाचने यांनी केले.
——————————————————————–
रविवारी स्पर्धेचे बक्षीस वितरण
जीव देखावा स्पर्धेचा निकाल रविवारी (या.२६) जाहीर होणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे २५००१, १५००१, आणि ११००१ रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय स्पर्धेतील सहभागी सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *