Sunday , September 20 2026
Breaking News

एलपीजी गॅस दरवाढीने रिक्षाची चाके थबकली

Spread the love

 

रिक्षा व्यवसायिक अडचणीत; दरवाढ मागे घेण्याची मागणी

निपाणी (वार्ता) : घरगुती वापराच्या सिलिंडर पाठोपाठ रिक्षांसाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. ५५ रुपये प्रतिकिलो मिळणारा गॅस थेट १२० रुपयांवर पोहोचल्याने रिक्षा चालकांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास रिक्षाचालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनण्याची भीती शहरातील रिक्षा व्यवसायिकातून व्यक्त केली आहे. प्रशासनाने गॅस दरवाढीवर तातडीने नियंत्रण मिळवून दिलासा देण्याचे आवाहनही रिक्षा व्यवसायिकांनी केले आहे.
एलपीजी गॅसच्या किमती गगनाला भिडल्याने रिक्षाचालकांची स्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर काही रिक्षा व्यवसाय कमी रिक्षा बंद करून घरी बसणे पसंत केले आहे. रिक्षा चालक-मालक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत शिष्टमंडळाने तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. एकीकडे बँकांचे हप्ते, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण अशा विवंचनेत रिक्षाचालक अडकले आहेत. त्यातच शासकीय नियमांनुसार रिक्षांचे आयुर्मान आणि फिटनेसकरवर अनेक मर्यादा आहेत. वाढत्या गॅसदरामुळे दैनंदिन कमाई इंधनावरच खर्च होत आहे. प्रवासी जुन्याच दराने भाडे देत आहेत. या दुहेरी कात्रीत रिक्षाचालक अडकले आहेत.
—————————————————————-
‘रिक्षाचालकांना एलपीजी गॅस आता परवडणारा राहिलेले नाही. कर्ज आणि कुटुंबाचा खर्च लक्षात घेता ते आर्थिक संकटात आहेत. प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन दरवाढ नियंत्रित करावी.’
-सुंदर खराडे,
अध्यक्ष शहर रिक्षा असोसिएशन, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *