Sunday , July 26 2026
Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांकडून राकसकोप जलाशयाची पाहणी; पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शहरासमोर पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी पाहणी करून उपलब्ध पाण्यासाठ्याचा आढावा घेतला.

शहराला प्रामुख्याने राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो.सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर वाढत असताना भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचे पाऊल उचलण्यासाठी सुरुवात केली आहे. पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जलाशयातील सध्याचा पाणीसाठा, मे महिन्या अखेरपर्यंत आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज, हिडकल जलाशयातून होणाऱ्या पूरक पाणी पुरवठ्याची सविस्तर माहिती घेतली.

सध्याचा पाणीसाठा नियोजनबद्ध वापरल्यास काही काळासाठी पुरेसा ठरू शकतो. मात्र पाण्याचा अपव्य टाळणे आणि पाणी काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शहरातील नागरिकांनीही पाणी बचतीसाठी सजग राहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *