Friday , June 5 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील कुंभार समाजातील ज्येष्ठ नागरिक सन्मानित : संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका पातळीवर कार्यरत असलेले दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळकडून रविवार (दि. 19) रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संत गोरा कुंभार पुण्यतिथी शिवस्मारक येथे दुपारी ३ वाजता करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित साधून कुंभार समाजातील चाळीसहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरू कुंभार होते. प्रमुख व्याख्याते म्हणून बी.एस. एन. एलचे निवृत्त अधिकारी एम. टी. कुंभार उपस्थित होते. व्यासपीठावर निवृत्त शिक्षक ए. बी. मुरगोड, कृष्णा कुंभार, भगवंत कुंभार, विजय कुंभार होते. उपस्थितीच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व संत शिरोमणी गोरा कुंभार मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात संत गोरा कुंभार विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. खानापूर सह बेळगाव, गर्लगुंजी, सिंगिंनकोप, फुलेवाडी, विश्रांतवाडी, घोटगाळी, बसुर्ते, देवाची हट्टी या गावातील चाळीसहून अधिक जेष्ठ नागरिकांचा कुंभरत्न पुरस्कार, शाल, श्रीफळ व मिठाई देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. प्रमुख व्याख्याते एम. टी. कुंभार यांनी संत शिरोमणी गोरा कुंभार यांच्यावर उपस्थितीना मार्गदर्शन करताना म्हणाले, मुखात अखंड विठ्ठलाचे नामस्मरण, काम हीच पूजा, वचनाला जागणारा, एकनिष्ठ भक्त म्हणून त्यांची ख्याती होती. त्यामुळे चिखल तुडवत असताना गमावलेले बाळ आणि दोन्ही हात कलम करून पुन्हा भक्तीचा जागर करत असताना फुटलेले हात हीच त्यांच्या नामस्मराची पोच पावती आहे. कार्यक्रमाला ज्योतिबा कुंभार, यशवंत पालकर, सातेरी कुंभार, राजू पालकर, नागाप्पा उत्तुरकर, धोंडीबा कुंभार, सोमनाथ कुंभार, तुकाराम कुंभार, विठ्ठल कुंभार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश चंदगडकर यांनी केले. सोमनाथ कुंभार यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *