Sunday , July 26 2026
Breaking News

मानवतेचा संदेश देणाऱ्या बसव वचन साहित्याचे अनुसरण गरजेचे : किरण जाधव

Spread the love

 

बेळगाव : बसवेश्वरांनी भक्ती आणि विचारांच्या माध्यमातून समाजाला मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला आहे. त्यांचे शरण साहित्य आणि वचन साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप युवा नेते किरण जाधव म्हणाले.
जगद्गुरू श्रीसंत बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून किरण जाधव यांनी यांनी गोवावेस येथील श्री बसवेश्वर उद्यानातील श्रीसंत बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
संत बसवेश्वरांचे शरण साहित्य मानवतेचा संदेश देणारे असल्याने त्यांच्या आचार-विचारांचे अनुसरण गरजेचे आहे, असेही किरण जाधव म्हणाले.
याप्रसंगी राजन जाधव, अभिषेक किल्लेकर, स्वप्निल भंडारी, परशराम, विवेक पाटील, पार्थ यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *