Sunday , September 20 2026
Breaking News

जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे आपल्या दैनंदिन जीवनातील ताण तणाव विसरून विठ्ठल नामाच्या गजरात भक्ती भावाने एकरूप होतात. तिथे सारे भेदभाव गळून पडतात. संत ज्ञानेश्वर सावता माळी सोपान देव चोखामेळा तुकाराम अशा संतांच्या साहित्यातून समाजाला नव संजीवनी प्राप्त होते, असे मत डॉ. श्रीपती रायमाने यांनी केले. येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. एम. हुरळी तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्य हेमा चिकमठ उपस्थित होत्या.
प्राध्यापक आणि विद्यार्थी वारकरी पोशाखात सहभाग घेऊन उत्कृष्ट कला सादर केली. याशिवाय संतांचे अभंग कविता सादर करण्यात आले. वेगवेगळ्या खेळ प्रकाराने महाविद्यालयाला पंढरपुराचे रूप प्राप्त झाले होते. कार्यक्रमास प्रा. बाबू नाईक, प्रा. व्ही. बी. सुतार, प्रा कोंडेकर, प्रा. गीता कमते, प्रा. एम. डी. गुरव, प्रा. सुनिता हन्ननारगी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. संगीता गुरवानगोळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. उत्तम कमते यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *