Sunday , September 20 2026
Breaking News

हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब ऊरुसानिमित्त विविध शर्यतीसह धार्मिक कार्यक्रम

Spread the love

निपाणी (वार्ता) : येथील संत बाबामहारव्हाण प्रस्थापित येथील श्री अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब (क-स्व.) यांचा उरूस मंगळवार (ता.२२) वार पासून प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त शर्यती मैदानाचे प्रयोजन करण्यात आल्याची माहिती उरूस कमिटीचे अध्यक्ष व चव्हाण वासस‌ बाळासाहेब सरकार यांनी केले आहे. ते आयोजित बैठकीप्रसंगी बोलत होते.

उत्सानिमित्त शनिवार (ता.१२) श्री संत बाबामहाराज चव्हाण मुळगादी चहाणवाडा व दर्गा देवस्थान येथे उरूसास सनई वादनाने प्रारंभ झाला आहे. शनिवार ता. १९ रोजी चव्हाण वारसांच्या हस्ते चुना चढवणे. २१ रोजी चव्हाण वारसांच्या हस्ते मंडा चढवणे. २२ रोजी गंधरात्र-गंध चव्हाण वाड्यातून पहाटे मिरवणूकीने निघेल. (बेडीवाल्यांचा उरूस). २३ रोजी भर उरूस चव्हाण वाड्यातून मिरवणूकीने येणारा गलेफ पहाटे चढविणेत येईल. (ताजा उरूस) २४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत खारीक व उदीचा कार्यक्रम चव्हाणवाडा जिजामाता चौक येथे होईल.
(शिळा उरूस) २५ रोजी मानाचे फकीरांची रवानगी व भंडरखाना होईल. त्यानंतर २७ रोजी पाकळणी कार्यक्रम, चव्हाण वारसदार व मानकरी लवाजम्यासह दर्गा व संत बाबामहाराज चव्हाण समाधीस अभिषेक व गोडा नैवेद्य, मानकऱ्यांची रवानगी व उरूस समाप्ती होणार आहे. उरसानिमित्त मंगळवार ता. २२ व बुधवारी २३ रात्रौ ८ वा. चव्हाणवाडा जिजामाता चौक येथे आतिषबाजी होईल.
२३ सकाळी ९ आंबेडकरनगर, अंमलझरी रोड‌वर‌विविध शर्यती होणार आहेत. जनरल बैलगाडीसाठी १०००१, ७००१, ४००१, जनरल घोडा-बैलसाठी अनुक्रमे ५००१ ३००१, २००१, जनरल घोडागाडीसाठी ७००१, ४००१, ३००१ अशी ही बक्षीसे देण्यात येणार आहेत तर रात्री ९.३० वाजता दर्गा मंडप येथे कवालीचा कार्यक्रम होणार आहे.
——————————————————————–
रस्ता कामामुळे समाधान
खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दर्गा मुख्य मार्गावरील रस्त पूर्ण करून दिले आहे. समाधान व्यक्त होत आहे. दंडवत घालणाऱ्या भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात सोनपावलांनी गौराईचे आगमन

Spread the love  दुपारनंतर महिलांची लगबग; भक्तीभावाने केली आरास निपाणी (वार्ता) : निपाणी शहर, ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *