







बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने आयोजित जायंट्स सप्ताहाचा शुभारंभ बालिका आदर्श विद्यालय येथे व्हॉलीबॉल स्पर्धेने उत्साहात करण्यात आला.
प्रसिद्ध डेव्हलपर व बिल्डर आर. एम. चौगुले आणि जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते नेटपूजन करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी फेडरेशन ऑफिसर पूजा प्रवीण त्रिवेदी, डोणकरी, मुख्याध्यापक तसेच फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्या संघांना मोमेंटो व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, उपाध्यक्ष अरुण काळे, डायरेक्टर राहुल बेलवलकर, आकाश लाटूकर, जयवंत पाटील, प्रदीप चव्हाण आणि सचिव विश्वास पवार यांच्या हस्ते विजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला.
जायंट्स सप्ताहाच्या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून सप्ताहाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली.

Belgaum Varta Belgaum Varta