







सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांचा पुढाकार
बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात बेळगाव शहरात विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी होत असतात. या कालावधीत गणेशभक्तांची दुचाकी नादुरुस्त झाल्यास त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी सहभागी पदाधिकारी तसेच विभागनिहाय मेकॅनिक यांची नावे व ठिकाणे खालीलप्रमाणे देण्यात आली आहेत.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी पुढाकार घेतला आहे.
संपर्क व्यवस्थेबाबत विशेष सूचना
गणेशभक्तांना आवश्यकतेनुसार त्वरित मदत मिळावी, यासाठी प्रत्येक विभागातील अधिकृत संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
एखाद्या गणेशभक्ताची दुचाकी नादुरुस्त झाल्यानंतर विभागातील सर्व मेकॅनिकना एकाच वेळी फोन केल्यास अनावश्यक गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणता मेकॅनिक कुठे जावा, कोणत्या वाहनाची दुरुस्ती करावी आणि उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन कसे करावे, यामध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रत्येक विभागासाठी अधिकृत संपर्क व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे गणेशभक्तांनी दुचाकीमध्ये बिघाड झाल्यास संबंधित विभागातील कोणत्याही एका अधिकृत संपर्क क्रमांकावर प्रथम संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास दुसऱ्या अधिकृत क्रमांकावरही संपर्क साधता येईल. विभागप्रमुख उपलब्ध मेकॅनिकशी संपर्क साधून संबंधित ठिकाणी मदत पोहोचवतील.
यामुळे फोनची पुनरावृत्ती, अनावश्यक गोंधळ आणि वेळेचा अपव्यय टाळून सेवा अधिक शिस्तबद्ध, जलद आणि नियोजनबद्ध पद्धतीने देता येईल.
*सहभागी पदाधिकारी*
अध्यक्ष : विजयकुमार निंबरगीकर
उपाध्यक्ष : राजू रेडेकर
सचिव : मारुती गुरव
खजिनदार : महेश काकतीकर
संचालक : विजय शिंदे
संचालक : गिरीश नाईक (पिल्लू मिस्त्री)
*विभागनिहाय संपर्क व सहभागी मेकॅनिक*
*विभाग 1 : धर्मवीर संभाजी चौक*
अधिकृत संपर्क :
बाबू कडमोली — 9945010431
दत्ता पाटील — 9449201655
सहभागी मेकॅनिक :
विक्रम आनंदाचे
सागर दिवटे
अमित पाटील
संजय कुडची
संतोष सिन्नर
संतु कामती
रमेश पाटील
बसवराज कुडची
सिद्धाप्पा डांगे
*विभाग 2 : वडगाव, सोनार गल्ली कॉर्नर, मुख्य रस्ता*
अधिकृत संपर्क :
निलेश चलगुडकर — 9844314877
प्रमोद कंगराळकर — 9036333388
मारुती वि. गुरव — 9844483388
सहभागी मेकॅनिक :
कुंदन कमकारहट्टी
मोहन भा. पाटील
महादेव मोरे
सोमनाथ हळदनकर
अक्षय काळगे
सूरज शिंदे
अभी चव्हाण
सुरज गवळी
*विभाग 3 : गोवावेस सर्कल, अनुग्रह हॉटेलजवळ*
अधिकृत संपर्क :
गिरीश नाईक (पिल्लू मिस्त्री) — 9945666946
महेश काकतीकर — 9242133283
विजय शिंदे — 9341493170
सहभागी मेकॅनिक :
विनोद पाटील
भरमगौडा पाटील
प्रमोद कित्तूर
*विभाग 4 : फोर्ट रोड विभाग, विजय ऑटो गॅरेज*
अधिकृत संपर्क :
विजयकुमार निंबरगीकर — 8951134277
राजू रेडेकर — 9902382345
सहभागी मेकॅनिक :
सागर तिवारी
नागोजी नाकारी
जोतिबा कारजकर
रवी नाईक
विशाल कोळे
मल्लू पाटील
परवीन पाटील
राजू उच्छुकर
*विभाग 5 : टिळक चौक, अनुपम हॉटेलजवळ*
अधिकृत संपर्क :
सचिन गवळी — 9972794053
रवी कढहट्टी — 9880737184
सहभागी मेकॅनिक :
सुशांत होनगेकर
विनायक चलगी
गणेशभक्तांसाठी विशेष सूचना
दुचाकी नादुरुस्त झाल्यास कृपया आपल्या जवळच्या विभागातील अधिकृत संपर्क क्रमांकावरच प्रथम संपर्क साधावा.
विभागातील सर्व मेकॅनिकना स्वतंत्रपणे फोन करू नये. विभागप्रमुख उपलब्ध मेकॅनिकशी संपर्क साधून संबंधित गणेशभक्ताला आवश्यक ती मदत पोहोचवतील.
यामुळे अनावश्यक फोन, गोंधळ आणि वेळेचा अपव्यय टाळून गरजू गणेशभक्तांना तातडीने आणि योग्य ठिकाणी मदत उपलब्ध करून देता येईल.

Belgaum Varta Belgaum Varta