Sunday , September 20 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.त्या निमित्त दिंडी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
के.जी. ते इयत्ता दुसरी अभंग आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तिसरी ते पाचवी उपवास पदार्थ स्पर्धा, सहावी ते आठवी संतांविषयी कथा कथन स्पर्धा, इयत्ता नववी आणि दहावी करिता ‘आषाढी एकादशीचे महत्त्व’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकातर्फे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यानी विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी व विविध संतांची वेशभूषा केली होती.
दिंडिचे पूजन व उद्घाटन मुख्याध्या पिका स्नेहा घाटगे यांच्या हस्ते झाले. त्यांनी भारतीय संस्कृती आणि त्यामध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व स्पष्ट केले. परंपरा, भक्ती, श्रद्धा आणि आरोग्य या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे आषाढी एकादशी होय असे सांगितले.
शहरातील विविध मार्गावरून दिंडी काढण्यात आली. विविध ठिकाणी त्याचे स्वागत झाले. विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, किर्तन व नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *