


शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम
निपाणी (वार्ता) : कारगिल विजय दिन आणि निपाणीतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय सुगते यांच्या सुविद्य पत्नी व गायिका आरती संजय सुगते यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले व संचालिका अपूर्वा चौगुले यांच्या संकल्पनेतून येथील नेसरीकर प्लॉटमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
२६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणासाठी ५२७ भारतीय जवानांनी सर्वोच्च बलिदान देत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्या अमर शहीदांना हरित अभिवादन करण्यासाठी तसेच आरती संजय सुगते यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले व संचालिका अपूर्वा चौगुले यांनी प्रत्येक वाढदिवस, सण आणि उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. वसुंधरा प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे,असे आवाहन नामदेव चौगुले यांनी केले. त्यांनी आरती सुगते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कारगिलच्या शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांनी बेळगावी येथील अम्मा फाउंडेशनतर्फे नामदेव चौगुले व अपूर्वा चौगुले यांना प्राप्त झालेल्या पर्यावरणप्रेमी शिक्षक दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेबद्दल सन्मानित केले.
यावेळी अपूर्वा चौगुले, डॉ. संजय सुगते, आरती सुगते, झाकीर कादरी, जेम्स सत्तेगिरी, मंजुनाथ जाधव, शोभा जत्राटे, विजय जत्राटे, शौकत इनामदार, अन्वरबी इनामदार, दिलावर सरकवास, मन्सूर मुल्ला, रफिक सरकवास, भगवंत कुरणे, मज्जीद भगवान, सुशांत कुरणे, सचिन शिंदे, रोहित चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेम्स सत्तेगिरी यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta