Sunday , September 20 2026
Breaking News

दसरा महोत्सवातील क्रीडा स्पर्धेत पार्श्वमती विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयातील विद्यार्थिनींनी दसरा महोत्सवांतर्गत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत विजेतेपद व पदके मिळविली. त्यामुळे या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत विद्यालयाच्या गौरी सुतार हिने १५०० विठ्ठल धावणे, संजली जबडे मी भालाफेक, मयुरी पाटील आणि समिध्या कोळी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
गौरी सुतार,भालाफेक प्रथम, तिहेरी उडी द्वितीय व १५०० मीटर धावणे, तिहेरी उडी, उंच उडी लांब उडी १०० मीटर धावण्यामध्ये यश मिळवले. त्यांनी ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यशस्वी खेळाडूंना पी. बी. आश्रमाचे उपाध्यक्ष राजू पाटील, शाळेचे उपाध्यक्षा अनिता पाटील, कार्यकारी संचालक महावीर पाटील, दादासाहेब मगदूम, सुंदर पाटील, अशोक होनशेट्टी, सन्मती रांगोळे, मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे, यु. पी. पाटील यांचे मार्गदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात सोनपावलांनी गौराईचे आगमन

Spread the love  दुपारनंतर महिलांची लगबग; भक्तीभावाने केली आरास निपाणी (वार्ता) : निपाणी शहर, ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *