Sunday , September 20 2026
Breaking News

गजानन महाराज संजीवन समाधी मंदिरात ५६ प्रकारचा नैवेद्य

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोहिदासनगरमध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराजांचा ११६ वा संजीवन समाधी सोहळा पार पडला. त्यानिमित्त ५६ प्रकारचा नैवेद्य दाखवण्यात आला.
पहाटे पाच वाजता शैलजा पाटील, अभिषेक पाटील व राजेंद्र पवार-वडर यांच्या हस्ते काकड आरती, अभिषेक, दुग्धाभिषेक अभिजीत कुलकर्णी यांच्या पौराहित्याखाली करण्यात आले. सहा वाजता महाराजांची आरास झाल्यानंतर महाआरती झाली. सकाळी ७.३० वाजता महाराजांच्या संक्षिप्त पोथीचे एक आसनी पारायण पार पडले. १० वाजता महाराजांच्या मूळ पादुका प्रदक्षिणा व पुष्पवृष्टी झाली. दुपारी १२ महाप्रसद वाटण्यात आला. सुमारे तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दुपारी १ वाजता झालेल्या महाआरतीस भाविकांनी उपस्थिती दर्शवून ‘गण गण गणात बोते’चा अखंड जयघोष केला. याकाळात श्याम दत्त भजनी मंडळाने सेवा दिली. महाराजांना ५६ प्रकारांचा नैवेद्य, प्रसाद दाखविण्यात आला. यावेळी शैलजा पाटील, अभिषेक पाटील, राजेंद्र वडर, अनिल पाटील, ज्योती पाटील, आरूष पाटील, अनुश पाटील यांच्यासह भाविक व मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात सोनपावलांनी गौराईचे आगमन

Spread the love  दुपारनंतर महिलांची लगबग; भक्तीभावाने केली आरास निपाणी (वार्ता) : निपाणी शहर, ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *