Sunday , September 20 2026
Breaking News

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love

 

वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे तहसीलदारांना निवेदन

खानापूर : खानापूर तालुक्यातील २१ हजारांहून अधिक वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांचे पेन्शन स्थगित करण्यात आल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. तांत्रिक तसेच अन्य कारणांमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना पेन्शन मिळत नसल्याने त्यांचे पेन्शन तातडीने पुन्हा सुरू करावे, अशी मागणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

महसूल विभागाकडून पेन्शन स्थगित झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे प्रमुख आर्थिक साधन बंद झाले आहे. विशेषतः वृद्ध, दिव्यांग व्यक्ती आणि विधवा महिलांसाठी पेन्शन ही दैनंदिन गरजा भागविण्याचे महत्त्वाचे साधन असल्याने प्रकरणांची तातडीने छाननी करण्याची मागणी करण्यात आली.

ग्राम लेखापाल, महसूल निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांना गावनिहाय सर्वेक्षणाचे आदेश देऊन स्थगित पेन्शन प्रकरणांची तपासणी करावी. सर्वेक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांचे पेन्शन कोणत्याही विलंबाशिवाय पुन्हा सुरू करावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनाची प्रत बेळगावचे उपायुक्त तथा जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन, कर्नाटकचे महसूल मंत्री जी. परमेश्वर, सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी तसेच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही पाठविण्यात आली आहे.

यावेळी प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, नितीन कुंभार आणि कल्लाप्पा लोहार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरच्या भातशेतीत हत्तींचा धुमाकूळ; ग्रामस्थांनी हत्तींपासून दूर राहण्याचे वन विभागाचे आवाहन

Spread the love खानापूर : खानापूर वन उपविभागातील विविध भागांत गेल्या आठवड्यापासून हत्तींच्या कळपाचा वावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *