Sunday , September 20 2026
Breaking News

शिक्षकांचा नेता म्हणून दत्तात्रय सावंत यांची लोकप्रियता : सीमाकवी रवींद्र पाटील

Spread the love

 

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात सदिच्छा भेट; कुद्रेमानी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

पंढरपूर : आषाढी एकादशी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आलेल्या पुणे विभागाचे मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील ग्रामस्थांनी त्यांच्या स्वगृही सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुद्रेमानी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सत्कारप्रसंगी शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दत्तात्रय सावंत यांना आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, “दत्तात्रय सावंत हे केवळ शिक्षक आमदार नसून शिक्षकांचा खरा नेता म्हणून राज्यभर लोकप्रिय आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे,” असे गौरवोद्गार काढले.

यावेळी सावंत यांनीही उपस्थित ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. आषाढी वारीसारख्या पवित्र पर्वात झालेली ही सदिच्छा भेट अत्यंत आत्मीय आणि संस्मरणीय ठरली.

या प्रसंगी सुरेश पाटील, बाळू कदम, शिवाजी गुरव, महादेव पाऊसकर, गावडू संभाजी पाटील, परशराम काकतकर, यल्लाप्पा काकतकर, महादेव मराठे, नाना पाटील, संजय पाटील, गोमाणा सुतार, संतोष लक्काप्पा पाटील आणि जोतिबा धामणेकर , वैजनाथ वाजंत्री उपस्थित होते. ग्रामस्थांनी दत्तात्रय सावंत यांना पुढील सार्वजनिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *