Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी येथील मराठा मंडळातर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आषाढी एकादशी निमित्त भव्य व भक्तिमय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या दिंडीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
दिंडीचे प्रमुख आकर्षण असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी पालखीचे पूजन शिक्षण समितीचे चेअरमन राजेश रघुनाथराव कदम तसेच संचालिका ज्योती राजेश कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांचा दणदणाट, मृदुंगाचा गजर, टाळ-मंजीऱ्यांचा निनाद आणि लेझीमच्या तालावर दिंडी उत्साहात मार्गस्थ झाली.
मराठा मंडळ, मंगळवार पेठ येथून प्रारंभ झालेली ही दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवार पेठ, चन्नम्मा सर्कल मार्गे साखरवाडी रस्त्याने पुन्हा मराठा मंडळ येथे दाखल झाली. मार्गभर विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत, शिवकालीन मावळे तसेच विविध पारंपरिक वेशभूषांमधून सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे, “शिवरायांमध्येच विठ्ठलाचे रूप” या भावनेचा अनुभव नागरिकांना विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून पाहायला मिळाला.
दिंडी दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी एकमेकांना गळाभेट देत वारकरी संप्रदायातील बंधुभाव जपला. छत्रपती शिवाजी महाराज चौक व चन्नम्मा सर्कल येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेली वारकरी परंपरेतील फुगडी आणि भक्तिमय नृत्याविष्कार यांना नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
दिंडीचे मार्गदर्शन हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर यांनी केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, प्राथमिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील, रेणुका फराकटे, लेखनिक मुकुंद कोरे तसेच प्राथमिक विभागाचे एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर, विद्यार्थी-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *