Monday , September 21 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील आणि रविंद्रनाथ जुवळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात आबासाहेब देसाई यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. पांडुरंग कारकल यांनी प्रार्थना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यानंतर रविंद्रनाथ जुवळी, अश्विनी पाटील, नारायण कोरडे, सुरेंद्र देसाई, अशोक कदम, विजय वाईगडे, विजयमाला पाटील, माणिक हुद्दार आणि एस. एस. वाडकर यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

तसेच विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे, योगिनी देसाई, अरविंद मुतकेकर आणि सुरेश प्रभू खानोलकर यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभंग सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. भरत गावडे आणि चंद्रशेखर गायकवाड यांनी कवितांचे सादरीकरण केले, तर अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी पंढरीच्या वारीतील आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ज्ञान, अध्यात्म आणि मनोरंजनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *