
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. २१) वाहतूक मार्गात बदल केला आहे. दुपारी २ वाजल्यापासून २२ एप्रिलला मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. चन्नम्मा सर्कल, काकती वेस रोड, कॉलेज रोड आणि पिंपळकट्टा परिसरातून येणारी चित्ररथ मिरवणूक नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर आणि कपिलेश्वर फ्लाय ओव्हरमार्गे कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त होईल.
किल्ला तलाव, आरटीओ, चन्नम्मा सर्कलमार्गे खानापूरकडे जाणारी वाहने आरटीओ, गोवावेस, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, गांधी चौक, केंद्रीय विद्यालय क्र. २, शर्कतपार्क आणि ग्लोब थिएटर सर्कलमार्गे वळविण्यात येतील. खानापूरकडून शहरात येणारी व गोगटे सर्कलमार्गे प्रवेश करणारी वाहने ग्लोब थिएटर सर्कल, शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय, शौर्य चौक, गांधी सर्कल, गणेश मंदिर, हिंडलगा रोड आणि हनुमाननगर डबल रोडमार्गे बॉक्साईट रोड व महामार्गाकडे वळवली जातील.
गोगटे सर्कलकडून रेल्वे स्टेशन, स्टेशन रोडमार्गे शनी मंदिराकडे जाणारी वाहने गोवावेस सर्कल, नाथ सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल आणि संभाजी गल्लीमार्गे वळविण्यात येतील. तसेच नाथ पै सर्कलकडून एपीएमसी रोडमार्गे कपिलेश्वर फ्लायओव्हरकडे जाणारी वाहने खासबाग बसवेश्वर सर्कल व संभाजी गल्लीमार्गेच सोडण्यात येतील. जिजामाता सर्कलकडून नरगुंदकर भावे चौक, पिंपळकट्टा मार्गे जाणारी वाहने केंद्रीय बसस्थानक व जुना पीबी रोडमार्गे वळवली जातील. तसेच जुने पीबी रोड, एआरएल लॉजिस्टिक, भातकांडे स्कूलमार्गे कपिलेश्वरकडे जाणारी वाहने संभाजी रोड, बसवेश्वर सर्कलमार्गे वळविण्यात येतील.
२१ एप्रिलला दुपारी २ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत शहरामध्ये सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. काकतीवेस रोड, गणपती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, शनी मंदिर परिसर, कपिलेश्वर फ्लायओव्हर तसेच कॅम्प परिसरातील हॅवलॉक रोड, कॅटल रोड, देशपांडे बूट परिसर आणि कॉलेज रोड येथे सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगवर बंदी घातली आहे. महिला पोलिस ठाण्याच्या मागील मोकळी जागा आणि संभाजी मैदान, महाद्वार रोड येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta