Friday , June 5 2026
Breaking News

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love

 

किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये गाव परिसरात अवैध खाणकाम उघडकीस आले असून, याप्रकरणी किणये येथील आठ जणांविरुद्ध शनिवारी (ता. १९) गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

या प्रकरणात भरमण्णा मारुती पाटील, जोमागौडा मारुती पाटील, प्रल्हाद महादेव पाटील, सुभाष नारायण गावडा, नारायण भरमाण्णा पाटील, संजय यशवंत पाटील, वीर पाटील आणि अक्षय पाटील (सर्व रा. किणये) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाच्या उपसंचालक बिंदन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी भरमाण्णा मारुती पाटील (वय २१) आणि ज्योमगौडा मारुती पाटील यांनी किणये गाव हद्दीतील त्यांच्या मालकीच्या सर्व्हे नं. १८३/२ या जमिनीत, तर अन्य आरोपी महादेव पाटील, सुभाष नारायण गावडा, नारायण भरमाण्णा पाटील, संजय यशवंत पाटील यांनी सर्व्हे नं. १८४/११ या जमिनीत अवैधरीत्या उत्खनन केल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण कारवाईत वीर पाटील आणि अक्षय पाटील यांचाही सहभाग असल्याचे नमूद केले आहे. ७ एप्रिलला दुपारी १२ वाजण्यापूर्वी, कोणताही परवाना किंवा शासनाची मंजुरी न घेता सर्व्हे नं. १८३/२ मधून सुमारे ५६२५ मेट्रिक टन खनिजाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली आहे.

या व्यवहारातून सुमारे ११ लाख २५ हजार आणि सर्वे क्रमांक १८४/१ मधून सुमारे ४,५०० टन खनिज काढून त्याची वाहतूक केली असून, त्यातून नऊ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत स्पष्ट केले आहे. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा झाल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार संशयित आरोपींच्या विरोधात माईन्स अॅण्ड मिनरल रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट व कर्नाटक मायनर मिनरल कन्स्टिटंन्स रुल्स आणि बीएनएस कायद्याखाली प्रकरणाची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्यास विरोध; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार

Spread the love  बेळगाव : सावगाव येथील सरकारी हायर प्रायमरी मराठी मुला-मुलींच्या शाळेच्या परिसरात कन्नड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *