Friday , June 5 2026
Breaking News

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बेकवाडच्या कलमेश्वर मंदिरात शिवलिंगावर अर्ध नटेश्वर सूर्यकिरणांचे दर्शन

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुक्यातील बेकवाड (ता. खानापूर) येथील प्राचीन कलमेश्वर मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एक अद्भुत आणि मनोहर दृश्य पाहावयास मिळाले. पहाटे उगवत्या सूर्याच्या किरणांनी मंदिरातील शिवलिंगावर ‘अर्ध नटेश्वर’ स्वरूपातील प्रकाशरेषा उमटल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.

सकाळी साधारणपणे 6.45 ते 7.05 या वेळेत हे सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताना दिसून आले. मंदिराच्या रचनेनुसार आणि वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांमुळे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या सुमारास हे दिव्य दृश्य अनुभवायला मिळते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

विशेष म्हणजे हे सूर्यकिरण पुढील काही दिवस सकाळच्या वेळेत दर्शनास येणार असल्याने परिसरातील भाविक या अलौकिक सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत.

या अद्भुत नैसर्गिक व आध्यात्मिक संगमामुळे बेकवाड परिसरात उत्साहाचे वातावरण असून, कलमेश्वर मंदिराची कीर्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *