Sunday , September 20 2026
Breaking News

चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांची दुचाकी नादुरुस्त झाली तर विनामूल्य सेवा!

Spread the love

 

बेळगाव : शिवजयंती उत्सव मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून अनेक शिवभक्त येतात. त्यावेळी त्यांच्या दुचाकी नादुरुस्त होऊन त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे. त्यांची ही अडचण मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या लक्षात येताच मंडळाचे उपाध्यक्ष श्री. गणेश दड्डीकर यांनी बेळगाव स्कूटर आणि मोटार मेकॅनिक ओनर असोसिएशन बेळगाव यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या विषयावरती औपचारिक बैठक घेतली.

या बैठकीत बेळगाव परिसरात कुठेही दुचाकी नादुरुस्त झाली तर विनामूल्य सेवा देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली. मिरवणूक काळात असोसिएशनचे सर्व पदाधिकारी धर्मवीर संभाजी चौक येथे सेवेकरीता उपस्थित राहणार आहेत. ज्यांना कुणाला मदत लागेल. त्यांनी खालील नंबरशी संपर्क साधावा.
अध्यक्ष विजयकुमार निंबरगीकर 8951134277, उपाध्यक्ष राजू रेडेकर 9902382345, पदाधिकारी महेश काकतीकर 9242133283, अमोल यल्लूपाचे 9738501683, गिरीश नाईक (पिल्लू मेस्त्री) 9945866946, सागर तिवारी 9632605327, विजय शिंदे 9341493170, प्रवीण ताशिलदार 9916610143

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *