Sunday , September 8 2024
Breaking News

अश्लील व्हिडिओ प्रकरण : खासदार प्रज्वल रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?

Spread the love

 

अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव

बंगळूर : अश्लील व्हिडिओ प्रकरणी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज सकाळी दहा वाजता हुबळी येथे धजद कोअर कमिटीची बैठक होणार आहे, सूत्रांनी सांगितले की, बैठकीत चर्चा झाल्यानंतर प्रज्वल रेवण्णा यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सेक्स स्कँडलप्रकरणी गुन्हा दाखल झालेले माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांना अटकेची भीती आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचे समजते.
त्याचवेळी धजद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले की, मंगळवारी होणाऱ्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अधिकृत आदेश जारी केला जाईल. प्रज्वलच्या हकालपट्टीबाबत देवेगौडा यांच्याशी चर्चा करून रविवारी रात्री निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील मुलींचा आवाज म्हणून मी आवाज उठवीन. प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कोणतीही तडजोड नाही. चूक झाली असेल तर कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी, असे ते म्हणाले.
शिमोग्यामध्ये बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी करण्यात येईल. ज्यांनी चूक केली आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कोण कुठे आणि कधी जाणार याची वाट पाहत बसायचे का? असा प्रश्न त्यांनी केला.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून धजद प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी स्वतः नातवाची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला असून, हसनचे अनेक अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह रस्त्यावर सापडला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबीयांनाही मान खाली घालावी लागणारी ही घटना आहे. लाज वाटली. तसेच धजद आमदारांनी स्वतः प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई करावी, त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती.
रेवण्णा आणि प्रज्वल यांनी अटकेतून वाचण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर लढाई सुरू केल्याचे समजते.
लैंगिक अत्याचाराच्या आरोपांबाबत पीडित महिलेने काल होळेनरसीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. माजी मंत्री एच. डी. रेवण्णाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल होताच दोघांना अटक होण्याची भीती निर्माण झाली आहे. अटकेपासून वाचण्यासाठी दोघांनीही कायद्याच्या चौकटीत राहून लढण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे.
प्रज्वल रेवण्णाचे सेक्स स्कँडल उघडकीस येताच राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ झाला. दोषींवर कारवाई करावी, अशी ओरड सुरू झाली. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
निवडणुकीदरम्यान उघडकीस आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होईल, अशी भीती भाजप-धजद युतीच्या नेत्यांना वाटत आहे.
या प्रकरणाचा निवडणुकीवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी भाजप-धजद नेत्यांनी डॅमेज कंट्रोल सुरू केले आणि कोणीही कायद्याच्यावर नाही आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असे सांगितले.
हा घोटाळा उघडकीस येताच धजदचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हा घोटाळा केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणा आणि डोकेदुखी आहे आणि याचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दोषींना कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे, असे सांगून पक्षाचे होणारे नुकसान काही प्रमाणात आटोक्यात आणण्याचे काम त्यांनी केले आहे.
या प्रकरणामुळे धजदमध्येही तणाव निर्माण झाला असून गुरुमटकल येथील धजदचे आमदार शारंगौडा कुंदकुर हे या प्रकरणामुळे खजील झाले आहेत. खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी माजी पंतप्रधान आणि धजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना पत्र लिहून निलंबनाची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे धजदमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे भाजप-धजद युतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणाऱ्या भाजप नेत्यांनी अंतर राखले.
कितीही मोठा असला तरी गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, कायद्यापुढे सर्व समान असल्याचे म्हटले आहे. भाजपनेही या प्रकरणाचा बचाव केलेला नाही. कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे.

कायदा सर्वांसाठी समान आहे. कायद्यासमोर कोणीही मोठे नाही. एसआयटीच्या तपासात सत्य समोर येईल. दोषींना शिक्षा व्हावी, असे विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले. तर माजी मंत्री सी.टी. रवी म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान आहे. या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होईल असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
एसआयटीच्या तपासातून सत्य बाहेर येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी म्हटले आहे. खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण कुठे जाणार आणि या प्रकरणाचा फटका कोणाला बसणार हे जाणून घेणे मनोरंजक आहे.

कारवाई निश्चित आहे : परमेश्वर
खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले. बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लैंगिक हिंसाचारातील पीडित महिला घाबरल्या असतील तर सरकार त्यांना सुरक्षा पुरविली जाईल. आम्ही या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. तपास पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
एसआयटी टीम या खटल्याच्या संदर्भात पेन ड्राईव्हसह सर्व साक्षीदार तपासत आहे. गरज भासल्यास प्रज्वल रेवण्णाला परदेशातून परत आणण्याचे काम केले जाईल, एसआयटी अधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ एफएसएलकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोप राजकीय हेतूने प्रेरित : रेवण्णा
एच.डी. देवेगौडा कुटुंबासाठी असे आरोप नवीन नाहीत, असे रेवण्णा यांनी सांगितले. हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे ते म्हणाले.
रेवण्णा यांनी आपल्यावरचे आणि मुलगा प्रज्वल यांच्यावरचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. सरकारला याची चौकशी करू द्या. कायद्यानुसार ते होऊ द्या, असे ते म्हणाले. त्याच वेळी, रेवण्णा यांनी आपला मुलगा प्रज्वल बेपत्ता झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सांगितले की मी पळून गेलो नाही. चौकशीसाठी बोलावले तर येईन. चौकशी करून कायदेशीर कारवाई करा. प्रज्वलला परदेशात जायचे होते. बोलावले तर तो येईल. देवेगौडा यांच्या कुटुंबावरील आरोप नवीन नाहीत. आम्ही सुरुवातीपासून याचा सामना करत आहोत, असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

रेणुकास्वामी हत्या प्रकरण : अभिनेता दर्शन आणि इतराविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर

Spread the love  बी. दयानंद; ३,९९१ पानांचे आरोपपत्र बंगळूर : बंगळुर पोलिसांनी बुधवारी रेणुकास्वामी हत्याकांडातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *